पू. वामन चालत असतांनाचे छायाचित्र पाहिल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहूया.
१. जाणवलेली सूत्रे
१ अ. विविध अनुभूती : ‘पू. वामन यांच्या हातांच्या मुद्रा आणि चेहरा यांच्याकडे पाहून मला तारक-मारक शक्ती जाणवली. त्या वेळी ‘आपत्काळात साधकांच्या रक्षणासाठी पू. वामन यांनी तारक-मारक रूप धारण केले आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२१)
१ आ. ‘पू. वामन यांचे नेत्र श्रीकृष्णाप्रमाणे वेध घेणारे, तसेच बोलके जाणवले.’ – सौ. सुचता वर्दे, दत्तनगर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२३.१०.२०२१)
१ इ. विविध अनुभूती
१. ‘माझ्याकडे सात्त्विक ऊर्जेचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.
२. त्यांनी ‘कपाळावर लावलेला टिळा काळा बुक्का आणि तो ‘विठ्ठल’ या देवतेशी संबंधित असावा’, असे मला जाणवले.’
– कु. अनुष्का घाडगे, (वय २१ वर्षे) कात्रज, पुणे. (२८.९.२०२१)
१ ई. अन्य अनुभूती
१. ‘पू. वामन यांच्या हातांची बोटे शक्ती एकवटत आहेत’, असे मला जाणवले.
२. ‘ते लोकोत्तर कार्यासाठी सज्ज होत आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. पांडुरंग ओक, मालाड, मुंबई. (२१.९.२०२१)
१ उ. ‘पू. वामन हे एक आदर्श राजा असून ते राजदरबारात जात आहेत’, असे मला जाणवले.’ – सौ. सुजाता रेणके, फोंडा, गोवा. (१८.९.२०२१)
१ ऊ. ‘ते पाताळातील वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध करत आहेत, तसेच त्यांच्यातील तारक आणि मारक तत्त्व एकाच वेळी जागृत झाले आहे’, असे मला जाणवले.’ – श्रीमती मधुरा तोफखाने, गावभाग, सांगली. (१७.९.२०२१)
१ ए. ‘हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेच्या कार्यार्थ दमदारपणे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज (१८.९.२०२१)
१ ऐ. ‘पू. वामन हातांच्या विशिष्ट मुद्रा करून पाताळातील अनिष्ट शक्तींशी युद्ध करत आहेत. त्यांच्या पावलांमधून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे अनिष्ट शक्ती शक्तीहीन झाल्याने पू. वामन यांच्या मुखावर विजयी भाव विलसत आहेत’, असे मला जाणवले.’ – सौ. वैशाली देसाई, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (२२.९.२०२१)
१ ओ. हिंदु राष्ट्र संबंधित अनुभूती
१. ‘साक्षात् विष्णूचे अवतार ‘वामन’ यांचेच अंश म्हणून ते पुन्हा पृथ्वीवर जन्माला आले आहेत’, असे मला जाणवले.
२. ‘पू. वामन यांचा आपत्काळात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी जन्म झाला आहे. त्यांनी गुरुदेवांना साहाय्य म्हणून जन्म घेतला आहे. ते हिंदु राष्ट्र चालवणार आहेत’, असे मला जाणवले.
३. त्यांच्या संपूर्ण देहाभोवती मला चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवली.’
– श्रीमती कुसुम घाडगे, कात्रज, पुणे. (२८.९.२०२१)
२. चांगल्या अनुभूती
२ अ. शस्त्र आणि देव यांचे दर्शन होणे
१. ‘त्यांच्या गळ्यातील पदक (लॉकेट) बघून मला धनुष्यबाणाचे दर्शन झाले.
२. छायाचित्राकडे पाहून मला श्रीकृष्णाचे विराट रूपात दर्शन झाले.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२१)
२ आ २. आनंद आणि स्थिरता जाणवणे अन् भावावस्था अनुभवणे : ‘पू. वामन यांच्या छायाचित्राकडे पाहून मला आनंद आणि स्थिरता जाणवली. पू. वामन यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्रे पाहिली आणि त्यांच्याविषयी लेख वाचले. त्यामुळे संपूर्ण दिवस मला भावावस्था अनुभवता आली.’ – सौ. सुचेता वर्दे, दत्तनगर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२३.१०.२०२१)
२ आ ३. ‘पू. वामन हे पृथ्वीवरील सर्व वाईट प्रवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी जन्मलेल्या संतांपैकी एक संत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी मला शक्ती, उत्साह आणि चैतन्य जाणवले.’ – कु. आकांक्षा ज्ञानेश्वर घाडगे (वय २१ वर्षे), कात्रज, पुणे. (२८.९.२०२१)
२ आ ४. कृतज्ञताभाव दाटून येणे : ‘पू. वामन यांचे सोवळे आणि उपरणे घातलेले गोजिरवाणे रूप पाहून परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले अन् मनातून कृतज्ञताभाव दाटून आला.’
– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी. (२४.९.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |