
‘मी ग्रंथांशी संबंधित सेवा करतो. ‘मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणे आणि इंग्रजी भाषांतर पडताळणे’, असे माझ्या सेवेचे स्वरूप आहे. मराठीतील लिखाण वाचतांना देव त्यातील काही त्रुटी किंवा चुका माझ्या लक्षात आणून देतो, उदा. सूत्र क्रमांक चुकलेला असणे, वाक्याचा अर्थ स्पष्ट होत नसणे, माहिती अयोग्य किंवा अपूर्ण असणे इत्यादी.
मध्यंतरी मी ‘कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास’ या ग्रंथाचे भाषांतर करत होतो. तेव्हाही देवाने मला भरभरून साहाय्य केले. ही धारिका पूर्ण झाल्यावर ‘अनवधानाने काही राहून गेले नाही ना ?’, हे पहाण्यासाठी मी संगणकीय धारिकेवर वरून खाली दृष्टी फिरवत होतो. त्या वेळी ‘कर्सर’ नेमकेपणाने एका चुकीवर येऊन स्थिरावला. येथे ‘परात्पर’ या शब्दाच्या ऐवजी ‘परापर’ असे चुकीचे लिहिले गेले होते. या ग्रंथात ‘परात्पर’ हा शब्द १७० पेक्षा अधिक वेळा आला आहे.
‘पूर्ण झालेल्या धारिकेवरून दृष्टी फिरवतांना देवाने नेमकेपणाने चूक दाखवून दिली’, ही देवाचीच कृपा आहे. त्यासाठी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. नितीन सहकारी, फोंडा, गोवा. (१२.११.२०२१)
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !