‘आप’ला १० दिवसांत १६४ कोटी रुपये भरण्याची नोटीस

  • पैसे न भरल्यास मालमत्ता जप्त होणार

  • राजकीय विज्ञापनांवर सरकारचे ९९ कोटी रुपये केले होते खर्च !

नवी देहली – देहली सरकारच्या माहिती आणि प्रसार संचालनालयाने (‘डीआयपी’ने) आम आदमी पक्षाला १६३ कोटी ६२ लाख रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली केली आहे. ‘आप’ला हे पैसे १० दिवसांच्या आत जमा करावे लागणार आहेत.  या रकमेमध्ये ९९ कोटी ३१ लाख रुपये मुद्दल आणि ६४ कोटी ३१ लाख रुपये दंड व्याजाचा समावेश आहे. जर पक्षाने तसे केले नाही, तर पक्षाची मालमत्ता जप्त करता येईल. आपने वर्ष २०१५-२०१६ या काळात राजकीय विज्ञापने दिली होती. त्यासाठी सरकारी पैशांचा वापर केला होता. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले होते.

संपादकीय भूमिका

‘आम्ही जनतेचे सेवक आहोत’, असे सांगणार्‍या आपवाल्यांचे जनताद्रोही रूप यातून दिसून येते. जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे आपवाले जनहितकारी कारभार काय करणार ?