ठाणे, ७ जानेवारी (वार्ता.) – कल्याण येथील सदगुरु श्री स्वामीसमर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती श्री नवनीतानंद महाराज (पू. अरुण मोडक महाराज) यांच्या पुढाकाराने प्रत्येक शाकंभरी पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन मलंगनाथांच्या समाधीची पूजा आणि आरती केली जात असे, हीच परंपरा महाराजांच्या अपघाती निधनानंतर भक्त आणि कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठ यांनी कायम ठेवली आहे. ६ जानेवारी या दिवशी ‘श्रीमलंग जय मलंग’ असा गजर करत मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ गडावर दाखल झाले. पू. मोडक महाराजांचे शिष्य श्री. सचिन चांदे यांच्या हस्ते मलंगनाथांच्या समाधीची पूजा आणि आरती करण्यात आली. त्या वेळी विकट गडावरील महंत ईशानंद महाराज, सुधीर थोरात (रायगड स्मारक समितीचे कार्यवाह), राजेश गायकर आणि मोडक महाराज यांचे शिष्य अन् हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.