पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील २ सहस्र ८७१ वाहनचालकांवर कारवाई !

पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बेशिस्‍त वाहनचालकांना शिस्‍त लावण्‍यासाठी परिवहन विभागाच्‍या वतीने ६ पथके सिद्ध केली आहेत. या पथकांच्‍या माध्‍यमातून महामार्गावरील वाहनांवर कारवाई करण्‍यात येत आहे. १ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण २ सहस्र ८७१ वाहनांवर दंडात्‍मक कारवाई केल्‍याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

यामध्‍ये वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या (ओव्‍हरस्‍पीड) ६६०, मार्गिका पालटणे (लेन कटिंग) ८९६, विना सीटबेल्‍ट ८८८, तर कुठेही गाडी थांबवणे (अवैध पार्किंग) ४२७ अशा वाहनांवर कारवाई केली आहे. या महामार्गावर प्रतिदिन किमान ४० सहस्र वाहनांची ये-जा असते. वाहनांच्‍या तुलनेत केलेली कारवाई अत्‍यल्‍प आहे.

संपादकीय भूमिका 

वेळीच जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम ! आतातरी नियम मोडणार्‍या वाहनचालकांना कठोर शिक्षा करून शिस्‍त लावणे आवश्‍यक आहे.