सीमेवर पाकिस्तानी घुसखोर ठार

सीमा सुरक्षा दल

अमृतसर (पंजाब) – येथे सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. घुसखोराकडे बंदूकही होती. सीमा सुरक्षा दलाने मृतदेह कह्यात घेऊन पुढील कारवाई चालू केली आहे. तस्करीच्या उद्देशाने तो भारतीय सीमेत घुसला असावा, असा अंदाज आहे. वर्ष २०२२ मध्ये २ घुसखोरांना ठार केले होते, तर २२ जणांना पकडले होते.