प्रथम विकृतींना दहन करा !

आज वर्ष २०२२ संपून २०२३ चे आगमन होणार आहे.  याच पाश्र्वभूमीवर वर्षातील वाईट गोष्टी दूर करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळे बनवून दहन केले जात आहेत. मुंबईच्या गिरगावमधील मंगलवाडीत एक पुतळा बनवण्यात आला आहे. दाढी वाढलेली, चेहर्‍यावर गुन्हेगाराप्रमाणे विकृत भाव, शर्ट आणि पँट यांवर रक्ताचे शिंतोडे उडालेले, त्याच्या हातात रक्ताने माखलेला सुरा आणि हातात कचर्‍याची काळी पिशवी ज्याला रक्त लागलेले आहे, असा पुतळा बनवला आहे. हा पुतळा श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे ३५ तुकडे करणार्‍या आफताब पूनावालासारख्या वाईट मानवी विकृतीचे दहन करण्याच्या हेतूने सिद्ध केलेला आहे. आज ३१ डिसेंबरला त्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. खरोखरच अशा पुतळ्याचे दहन केल्याने विकृती नष्ट होऊ शकते का ? लव्ह जिहादसारख्या गंभीर समस्येचे निराकरण होऊ शकेल का? धर्मांध तरुणांमधील विकृती नष्ट करण्यासह आपण आपल्या मुलींना कशा प्रकारे संरक्षण देऊ शकतो ? लव्ह जिहादच्या संदर्भात कशा प्रकारे मुलींचे प्रबोधन करू शकतो ? याचा विचार करायला हवा.

प्रथमतः आफताबसारख्या विकृती आहेत आणि हिंदू मुलींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, हे आपण मान्य करायला हवे. लव्ह जिहादशी लढण्यासाठी सर्वच हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मूठभर हिंदूंनी प्रयत्न करून ही समस्या सुटणे अशक्य आहे. घराबाहेर जाणार्‍या प्रत्येकच मुलगी आणि महिला यांना लव्ह जिहाद, त्या माध्यमातून दर्शवले जाणारे प्रेम (एक प्रलोभन) यांविषयी पालकांनी समजावून सांगायला हवे. आदर्श पालक म्हणून मुलींना अवास्तव दिले जाणारे स्वातंत्र्यावरही आळा घालायला हवा. त्यासह पाल्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासह स्वसंरक्षण प्रशिक्षण देऊन शार्यजागृत करायला हवे. मनामध्ये धर्माभिमान जागृत असल्यास मुली ‘मी योग्य करते आहे का ? मी करत असलेल्या कृतीचा माझे धर्मबांधव, कुटुंबीय आणि समाज यांवर काय परिणाम होईल ?’, याचा विचार करू शकतील. भारतभूमीचा जाज्वल्य आणि पराक्रमी इतिहास मुलींना शिकवायला हवा. त्यातूनच त्यांना लढण्याची स्फूर्ती मिळणार आहे. माता-पित्यांना प्रसंगी कठोरही होता आले पाहिजे. अन्यथा प्रतिदिन कुठल्या ना कुठल्या प्रदेशात एक श्रद्धा वालकर निर्माण होत आहे. लव्ह जिहादच्या समस्येशी लढतांना मी, माझे कुटुंब, पद, प्रतिष्ठा या संकुचितता निर्माण करणार्‍या विकृतींचे प्रथम दहन करूया !

– श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा