भारत पाकहून वरचढ असल्याने पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याचे अभियान यशस्वी होईल ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलतांना पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याचे संकेत दिले. त्यावर भारताचे ‘नॉर्दन आर्मी’चे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘आम्हाला जो आदेश मिळेल, त्यासाठी सैन्य सिद्ध आहे.’’

या संदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलतांना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, ‘‘भारताचे सैन्य सर्व दृष्टीने सक्षम आहे. भारताचा जो भूभाग पाकिस्ताने अवैधपणे बळकावला आहे, त्याला परत प्राप्त करण्यासाठी ‘कन्व्हेंशनल वॉरफेअर’ (पारंपरिक युद्ध) आणि अणूयुद्धातही भारत अनेक पटीने पाकिस्तानहून वरचढ आहे, असे मला वाटते. तसेच याची पाकिस्तानलाही पूर्ण कल्पना आहे. याचा अनुभव त्यांनी वर्ष २०१६ मध्ये घेतला आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याचे अभियान यशस्वी होण्यात भारताला कोणतेही अडथळे येणार नाहीत.’’

(साभार : फेसबूक)