घनजीवामृत बनवण्याची कृती

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘उन्हात वाळवलेले १० किलो शेण घ्यावे. त्यातील ढेकळे फोडून ते रेती चाळायच्या चाळणीने चाळून घ्यावे. असे केल्याने शेणात काही दगड किंवा अन्य कचरा असल्यास तो वेगळा होतो. आता या चाळलेल्या शेणावर १ लिटर (शेणाच्या वजनाच्या १० टक्के प्रमाणात) जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यांपासून बनवलेले द्रव स्वरूपातील नैसर्गिक खत) शिंपडावे आणि चांगले मिसळून घ्यावे. हे मिश्रण ४८ घंटे सावलीत सुती कापडाने किंवा गोणपाटाने झाकून ठेवावे. त्यावर ऊन किंवा पावसाचे पाणी पडू देऊ नये. ४८ घंट्यांनी हे घनजीवामृत वापरता येते. (घनजीवामृत कसे वापरावे, हे उद्याच्या लेखात जाणून घेऊ.)

घनजीवामृत सिद्ध झाल्यानंतर वर्षभर साठवायचे असेल, तर ते उन्हात पसरून चांगले वाळवून घ्यावे आणि ओलावा पूर्णपणे निघून गेल्यावर तागाच्या गोणीमध्ये (जूट बॅगमध्ये) भरून ठेवावे. ही गोणी ओल लागणार नाही, अशा ठिकाणी ठेवावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (८.१२.२०२२)