संभाजीनगर – ‘ई-चलान’ऐवजी ऑफलाईन चलान आकारावे, खासगी वाहनचालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख आणि मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य द्यावे आदी मागण्यांसाठी ‘जय संघर्ष वाहनचालक संस्थे’द्वारे २० डिसेंबर या दिवशी येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात १० सहस्रांहून अधिक खासगी चालक सहभागी होणार आहेत.