पुणे – लोकशाही पद्धतीने विरोध नोंदवण्यास माझा कोणताच विरोध नव्हता; पण आक्रमणकर्त्यांनी केलेले हे आक्रमण नियोजित होते. माझ्यावर केलेली शाईफेक घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते ? असा संतप्त प्रश्न उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. स्पर्धा परीक्षा संमेलनाच्या वेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. आंबेडकर, फुले यांच्या बद्दल माझ्या मनात कोणताही अनादर नाही. तरीही कुणाचे मत दुखावले गेल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.