कर्नाटकातील दत्तपीठ मार्गावर खिळे फेकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

महंमद शाहबाज आणि वाहिद हुसेन

चिक्कमगळुरू – दत्तजयंतीच्या वेळी दत्तपीठाकडे जाणार्‍या मार्गावर अपघात घडावा, या उद्देशाने धोकादायक अपघाती वळणांच्या मार्गांत खिळे टाकणार्‍या २ धर्मांधांना अटक करण्यात आली. ‘फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती देतांना जिल्हा पोलीस अधीक्षक उमा प्रशांत म्हणाल्या की,  त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली. शहरातील एका दुकानातून ४ किलो एकाच प्रकारचे खिळे दोघा व्यक्तींनी खरेदी केले असल्याचे खात्रीलायक वृत्त समजताच दुबैैनगरातील महंमद शाहबाज (वय २९ वर्षे) आणि वाहिद हुसेन (वय २१ वर्षे) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी काहीजण सहभागी असल्याची माहिती मिळाली असून ते फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • दत्तपीठावर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहेच; मात्र आता हिंदूंनी तेथे जाऊ नये, यासाठी धर्मांध कशा प्रकारची कुकृत्ये करत आहेत, हे यातून लक्षात येते !