‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ला दिला जाणारा पुरस्कार रहित केल्याचे प्रकरण
मुंबई – ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या नक्षलवादासाठी शिक्षा झालेल्या कोबाड गांधी यांच्या इंग्रजी पुस्तकाचा अनघा लेले यांनी केलेल्या मराठी अनुवादाला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नावाचा घोषित केलेला पुरस्कार रहित केल्याच्या निषेधार्थ माजी संमेलनाध्यक्ष आणि भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र पाठवले.
देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे की, मी हे पुस्तक वाचले असून त्यात आपण म्हणता तसे नक्षलवादाचे उदात्तीकरण किंवा आक्षेपार्ह काही नाही. शासनाकडे पुस्तकाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या आक्षेपाविषयी अनुवादिका श्रीमती अनघा लेले यांचे मत घेऊन त्यावर विचार करून पुरस्कार रहित करण्याचा निर्णय घेतला असता, तर समजून घेता आले असते.