‘एप्रिल २०२२ मध्ये व्हिसा संपल्यानंतरही भारतात अवैधपणे रहाणार्या विदेशी नागरिकांची संख्या ४ लाख २१ सहस्र २५५ इतकी होती. महाराष्ट्रात ५४ सहस्र २५९, तर मुंबईमध्ये अवैधपणे रहाणार्या विदेशी नागरिकांची संख्या ५ सहस्र ६२३ इतकी होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबईमध्ये अवैधपणे रहाणार्या ६२५ नागरिकांना पकडण्यात आले, तर महाराष्ट्रात अवैधपणे रहाणार्या नागरिकांपैकी एप्रिलपासून केवळ १८ सहस्र ८३८ नागरिकांचा शोध अन्वेषण यंत्रणांना लावता आला.’ (१०.१२.२०२२)