विशाळगडावरील अनधिकृत बांधकामास उत्तरदायी असणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

संजय पवार

कोल्हापूर – ऐतिहासिक विशाळगडासारख्या संरक्षितस्थळी पक्के बांधकाम करण्यास अनुमती नसतांना येथे २-३ मजली इमारती बांधल्या कशा गेल्या ? त्या वेळी प्रशासन काय करत होते ? त्यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट करणार्‍या आणि अतिक्रमणास उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करावे. गडावरील मूळ अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने ७ दिवसांत काढावे; अन्यथा १९ डिसेंबरला शिवसैनिक विशाळगड अतिक्रमणमुक्त करतील, अशी चेतावणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले उपस्थित होते.