संतपिठासाठी निधी देऊन स्वायत्त संस्थेच्या दर्जासाठी प्रयत्न करणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पैठण (जिल्हा संभाजीनगर) – पैठण येथे संतपिठाची नवीन इमारत उभारण्यासाठी सरकारच्या वतीने निधी दिला जाईल. त्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करू, तसेच संतपिठाला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यासाठीही आपण प्रयत्न करू, असे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १० डिसेंबर या दिवशी येथे दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित या संतपिठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा ९ डिसेंबर या दिवशी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांसह विविध मान्यवर अन् अधिकारी उपस्थित होते.