बीड – मागील निवडणुकीचा खर्च न भरल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये १ सहस्र १४ हून अधिक उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणूक लढवतांना निवडणुकीचा जमाखर्च न भरलेल्यांची सूची ५ डिसेंबर या दिवशी तहसील कार्यालयासमोर लावण्यात आली. या सूचीमध्ये ज्या उमेदवारांनी मागील निवडणुकीमधील खर्च जमा केला नाही अशांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या सूचीमध्ये सरपंच पदाचे उमेदवारही अपात्र ठरले आहेत.
ज्या ठिकाणी उमेदवार अपात्र ठरले आहेत, त्या ठिकाणी आता बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत त्यांनी न्याय मिळावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संपादकीय भूमिकानिवडणुकीचा जमाखर्चही वेळेत न भरणारे लोकप्रतिनिधी प्रभागाचा विकास काय साधणार ? असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? |