नीमास्त्र

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘किडींपासून रोपांच्या संरक्षणासाठी सुभाष पाळेकर कृषी पद्धतीत नैसर्गिक औषधे वापरली जातात. त्यांतीलच हे एक आहे. १ लिटर (१ तांब्या) पाण्यात ५ मि.लि. (१ चमचा) गोमूत्र, ५ ग्रॅम (२ चमचे) कडूनिंबाच्या पानांची चटणी आणि ५ ग्रॅम (२ चमचे) देशी गायीचे ताजे शेण मिसळून चांगले ढवळून घ्यावे. (चमच्यांचे प्रमाण चहाच्या चमच्याने मोजावे.) हे मिश्रण २४ घंटे झाकून ठेवावे. त्यानंतर हे गाळून घ्यावे आणि पाणी न मिसळता तुषारांच्या (स्प्रेच्या) बाटलीत भरून झाडांवर फवारावे. आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात ‘नीमास्त्र’ बनवून ते ताजेच वापरावे. निमास्त्राच्या फवारणीने पिठ्या ढेकूण (मिलिबग), रस शोषणार्‍या अळ्या यांचे नियंत्रण होते. बहुतेक किडी पानांच्या खालच्या बाजूने असतात. त्यामुळे तीन्हीसांजेच्या वेळी पानांच्या खालच्या बाजूने औषधाचे तुषारसिंचन करावे.’

– सौ. राघवी कोनेकर, फोंडा, गोवा. (२९.११.२०२२)