प्रवचन सनातनचे ऐकूनी, आनंद झाला मनी ।

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली प्रवचने ऐकून एका जिज्ञासू स्त्रीला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

सौ. सुनीता बहिरट

प्रवचन सनातनचे ऐकून
आनंद झाला मनी ।
‘श्री गुरुदेव दत्त ।’
नामजप करावा प्रतिदिनी ।। १ ।।

सतत करावा नामजप साधना करावी पूर्ण ।
राहिलेले अधुरे काम होते सफळ संपूर्ण ।। २ ।।

चैतन्यमय नामजप करता ऊर्जा मिळाली खूप ।
प्रत्येक शब्द ऐकूनी मनास आला हुरूप ।। ३ ।।

लयबद्ध आवाज (टीप १) छान भिडला काळजाला ।
नाना प्रकारचे प्रश्न विचारता उत्तर मिळे प्रत्येकाला ।। ४ ।।

नरजन्म मिळाला आहे, करावी निष्काम भक्ती ।
प्रवचनाचा योग आला मिळेल सकारात्मक शक्ती ।। ५ ।।

वेळोवेळी भोगावे लागतात आपल्या प्रारब्धाचे भोग ।
अढळ असावी साधना, पळून जातात सगळे रोग ।। ६ ।।

पितृऋणाचे महत्त्व नामजप अन् तप साधना ।
प्रवचन ऐकावे सनातनचे छान, करून आराधना ।। ७ ।।

टीप १ : प्रवचन घेणार्‍याचा आवाज

– सौ. सुनीता बहिरट, आळेगाव, जुन्नर, जिल्हा पुणे. (७.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक