शेतकर्यांनी पैसे भरलेले असतांनाही वीज खंडित !
संभाजीनगर – कृषीपंपधारकांकडे थकित असलेल्या वीजदेयकांसाठी राज्यभरात महावितरणच्या वतीने कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम चालू आहे. पैठण तालुक्यातील ४ सहस्र शेतकर्यांच्या कृषीपंपांची वीज तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे यांतील ३ सहस्र ७१६ शेतकर्यांनी थकित देयकांचा भरणा केला आहे. तरीही त्यांची वीजजोडणी तोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असतांना दुसरीकडे पैठण येथील आमदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या नावावर १ लाख ३१ सहस्र १६० रुपयांची विजेची थकबाकी आहे. तरीही त्यांची वीजजोडणी तोडण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘१० ते २० सहस्र रुपयांच्या वीज थकबाकीपोटी शेतकर्यांची वीज बंद केली जाते, तर विलास भुमरे यांची वीजजोडणी का तोडण्यात येत नाही ?’, असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.
संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातही वीजदेयक थकित असणार्या शेतकर्यांची वीजजोडणी खंडित करण्यात येत आहेत.
संपादकीय भूमिकालाखो रुपयांची थकबाकी होईपर्यंत महावितरणाच्या अधिकार्यांनी काहीच केले नाही का ? सामान्यांना वेठीस धरणारे महावितरण लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना पाठीशी घालते, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |