अचलपूर येथे अन्नातून ५२ जणांना विषबाधा !

अचलपूर येथे अन्नातून ५२ जणांना विषबाधा

अमरावती – जिल्ह्यातील अचलपूर येथील जीवनपुरा येथे २ दिवसांपूर्वी एका ठिकाणी एक कार्यक्रम होता. या वेळी कार्यक्रमात जेवलेल्या व्यक्तींपैकी ५२ जणांना पोटदुखीसह अन्य त्रास झाल्यामुळे ४ डिसेंबरच्या सायंकाळी त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत उपचारांसाठी आलेल्या रुग्णांमध्ये ८ बालकांचा समावेश असून उर्वरित स्त्रिया आणि पुरुष आहेत.