सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘आपल्या लागवडीमध्ये पक्षी येणे’, हे कीडनियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे. झाडांवरील वेगवेगळ्या अळ्या, किडे जे आपल्याला दिसतही नाहीत, ते पक्ष्यांना सहज दिसू शकतात आणि ते त्यांच्या अत्यंत आवडीचे खाणे असते. पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी लागवडीमध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी रोपे अवश्य लावावीत. ही रोपे म्हणजेच ‘पक्षी थांबा’. या रोपांच्या कणसांतील कोवळे दाणे खाण्यासाठी पक्षी येतात आणि या दाण्यांसह अन्य रोपांवरील किडींनाही वेचून खातात.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, गोवा. (२५.११.२०२२)