सातारा, १ डिसेंबर (वार्ता.) – भुईंज पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची मागणी करणार्या फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून इतरांवर जरब बसेल अशी कारवाई त्यांच्यावर करायला हवी ! – संपादक)
निवास शंकर मोरे आणि संजय प्रभू माटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निवास मोरे हे भुईंज पोलीस ठाण्यात फौजदार पदावर कार्यरत आहेत. फौजदार लाच मागत असल्याने तक्रारदारानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तडजोडीअंती २५ सहस्र रुपये देण्याचे ठरले. लाच स्वीकारण्यासाठी त्रयस्थ व्यक्ती येणार असल्याचे समजताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.