विनाअनुमती चालू असलेल्या रॅपिडो या ‘बाईक टॅक्सी ॲप’ प्रकरणी गुन्हा नोंद !

पिंपरी – कोणतीही अनुमती नसतांना आस्थापनाने अवैध ‘बाईक टॅक्सी ऑनलाईन ॲप’ चालू केले. वाहनचालक आणि प्रवासी यांना हे ‘ॲप’ कायदेशीर असल्याचे भासवून त्यांच्याकडून प्रवासी वाहतूकही करून घेतली. (अवैध ॲप चालू करून त्याद्वारे वाहतूक होत असतांना पोलीस आणि प्रशासन यांना ते लक्षात कसे आले नाही ? या प्रकरणी संबंधित दोषींवरही कारवाई हवी. – संपादक) त्यामुळे रॅिपडो आस्थापनावर गुन्हा नोंद केला आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्या अन्वये भांडारकर रस्त्यावरील रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. रॅपिडो हे ‘बाईक टॅक्सी ॲप’ विनाअनुमती आणि अवैध आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.