सातारा, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – जेवण महाग आहे, असे म्हटल्यामुळे आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील एका धर्मांध हॉटेलमालकाने ग्राहकावर तलवारीने आक्रमण केले. २६ नोव्हेंबरच्या रात्री १२.३० वाजता ही घटना घडली असून भुईंज पोलिसात याची नोंद झाली आहे.
पुणे-बेंगळुरू महामार्गावर आनेवाडी पथकर नाक्याजवळ हॉटेल महाराज येथे २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२.३० वाजता किशोर तोडरमल आणि त्यांचा भाचा कृष्णात् हे जेवणासाठी थांबले. हॉटेलमध्ये जेवणाची चौकशी केली असता ‘जेवण पुष्कळ महाग आहे’, असे म्हटल्यामुळे हॉटेलमालक अशरफ अस्लम शेख यांना पुष्कळ राग आला. त्यांनी शिवीगाळ करत तोडरमल आणि त्यांचा भाचा यांना ढकलून दिले. ‘‘मी आता तुम्हाला जिवंत ठेवणार नाही’’, असे म्हणत हॉटेलमधून तलवार आणून कृष्णात् यांचे डोके आणि डावा हात याांवर वार केले. यामध्ये कृष्णात् हे गंभीर घायाळ झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. घायाळ झालेल्या कृष्णात् यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाक्षुल्लक कारणांवरून तलवारीने मारहाण करणारे उद्दाम धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. यावरून धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचे भय नाही, हेच लक्षात येते ! |