एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे जामिनावर कारागृहाबाहेर !


मुंबई – एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण यांतील आरोपी आनंद तेलतुंबडे यांना जामीन मिळाल्याने त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. १ लाख रुपयांच्या जामिनावर २६ नोव्हेंबर या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपी म्हणून एप्रिल २०२० ला तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर या दिवशी त्यांना जामीन संमत केला होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.