वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यापासून गुजरातमध्ये शांतता आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कर्णावती (गुजरात) – पूर्वी असामाजिक घटक हिंसाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावर काँग्रेस त्यांचे समर्थन करत असे; मात्र वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यावर गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाया बंद केल्या. त्यानंतर भाजपने राज्यात कायमस्वरूपी शांतता निर्माण केली, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महुधा येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत केले. वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती रेल्वेगाडीमध्ये कारसेवकांना जिवंत जाळण्यात आल्यावर राज्यात दंगल उसळली होती.

सौजन्य : NDTV

अमित शहा म्हणाले की, गुजरातमध्ये काँग्रेसच्या शासनाकाळामध्ये नेहमीच दंगली होत असत. काँग्रेस वेगवेगळ्या धर्मियांना आणि जातींना एक दुसर्‍याच्या विरोधात भडकावत होती. काँग्रेसने अशा माध्यमांतून मतपेढी भक्कम केली होती आणि समाजातील एका मोठ्या वर्गावर अन्याय केला होता. काँग्रेसचे समर्थन मिळत राहिल्याने गुन्हेगारांना सवय झाली होती. त्यामुळेच वर्ष २००२ मध्ये दंगल झाली; मात्र त्यांना धडा शिकवण्यात आल्यावर त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून दिला. आजपर्यंत ते हिंसाचारापासून दूर आहेत.