सरकारी कामात अडथळा आणणार्‍या मुसलमान महिलेस अटक !

वाहतूक हवालदाराला शिवीगाळ करून वाद घातल्याचा आरोप

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – विनाशिरस्त्राण (हेल्मेट) दुचाकी चालवल्याप्रकरणी कारवाई करणार्‍या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणार्‍या बिस्मिल्ला रेहमनुल्ला शेख या महिलेला दिंडोशी पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध शिवीगाळ करून पोलिसांशी हुज्जत घालणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. (मुसलमानांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते पोलिसांना शिवीगाळ करण्याचे धाडस करतात. अशांना कठोर शिक्षा झाल्यासच या प्रकारांना आळा बसेल ! – संपादक)