विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात जाऊन मुसलमान विद्यार्थ्यांना चोपले !

सूरत (गुजरात) येथील महाविद्यालयात ‘लव्ह जिहाद’ !

सूरत (गुजरात) – येथील भगवान महावीर महाविद्यालयात हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ मुसलमान विद्यार्थ्यांना विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात जाऊन चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आलेली नाही.

१. महाविद्यालयातील काही मुसलमान विद्यार्थी सुनियोजितपणे हिंदु विद्यार्थिनींना प्रेमाच्या  जाळ्यात ओढत असल्याची आणि काही विद्यार्थिनींना धमकावत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्यांनी महाविद्यालयात ‘स्टिंग ऑपरेशन’ (संबंधितांकडून गोपनीय माहिती काढून घेतांना त्याचे छुप्या कॅमेर्‍याद्वारे चित्रीकरण करणे) करून जीतू शेख यासह अन्य आरोपी विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना चोपले. जितू शेख याने ३ हिंदु विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. स्टिंग ऑपरेशनमध्ये जितू शेख याने २ हिंदु तरुणींची नग्न छायाचित्रे असल्याचे सांगितले होते.

२. याविषयी विहिंपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नावडिया यांनी पत्रकारांना सांगितले की, आमच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालयातील काही मुसलमान तरुण हिंदु तरुणींशी जवळीक वाढवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांचे काही मुलींशी प्रेमप्रकरणही होते. एवढेच नाही, तर ते सामाजिक माध्यमांवर हिंदु नावाने खाते उघडून हिंदु तरुणींशी चॅटिंगही करत होते. त्यांची ओळख पटवून त्यांना पकडण्यात आले. त्यांना समजावून सोडून देण्यात आले; मात्र त्यांनी भविष्यात असे कृत्य केले, तर आम्ही त्यांना सोडणार नाही. सूरतच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘लव्ह जिहाद’ रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते या वेळी म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • हिंदु तरुणी मुसलमान तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाहीत किंवा मुसलमान तरुण ‘हिंदु असल्याचे सांगत आहे’, हे लक्षात येण्यासाठी हिंदु तरुणींना हिंदु संघटनांनी धर्मशिक्षणासह त्यांना लव्ह जिहाद्यांचा कावेबाजपणा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे !