हलाल सक्तीविरोधी समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना तीव्र आंदोलन करणार !
पुणे – लोणावळा, कार्ला येथील हिंदूंचे जागृत आणि प्रसिद्ध असलेल्या श्री एकवीरादेवीच्या मंदिर परिसरातच मुसलमानांनी उघडपणे हलाल मांसविक्रीची दुकाने थाटली आहेत. यासह ‘हलाल मटण मिळेल’, असे फलक लावून मंदिराच्या परिसरात उघडपणे हलाल मांसाची विक्री चालू आहे. हिंदूंच्या मंदिराचे पावित्र्य नष्ट करणार्या या मांसांच्या दुकानांना तीव्र विरोध करण्याची भूमिका हलाल सक्तीविरोधी समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी घेतली आहे.
श्री एकवीरादेवीच्या मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही मटणविक्रीची दुकाने आहेत. ‘येथे बोकडाचे आणि ब्रॉयलर हलाल मटण मिळेल’, ‘येथे ताजे आणि स्वच्छ हलाल चिकन मिळेल’, असे फलक उघडपणे लावून मंदिराच्या परिसरात ही मांसविक्री चालू आहे. श्री एकवीरादेवीचे मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. ही देवी ठाकरे कुटुंबाची कुलदेवता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देवीच्या दर्शनासाठी नित्य जात. सध्या मंदिराला मुसलमानांचाच विळखा असल्याचे पहायला मिळत आहे.
दुकानांना हिंदूंच्या देवतांची नावे देऊन हलाल मांसाची विक्री !
या सर्व दुकानांची नावे मात्र ‘जय मल्हार मटण शॉप अँड चिकन शॉप’, ‘आई एकवीरा मटण अँड चिकन शॉप’, ‘जय आंबिका मटण अँड चिकन शॉप’, ‘पाप्या चिकन सेंटर’ अशी नावे आहेत.
मंदिर परिसरातील मद्य आणि मांस विक्रीच्या दुकानांवर सरकारने बंदी घालावी ! – हिंदु जनजागृती समिती
हिंदूंच्या देवतांना न मानणारे अन्य धर्मीय मंदिरांच्या परिसरात येऊन व्यवसाय करत आहेत. श्री एकवीरादेवीच्या मंदिराच्या परिसरात मांसविक्रीची दुकाने असूच नयेत. तिथे हिंदूंसाठी निषिद्ध असलेल्या हलाल मांसाची विक्री होते, हे हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्यासारखे आहे. आमच्यासह सर्व संघटनांचा याला विरोध आहे. सध्या मंदिर परिसरात मद्य आणि मांस यांची विक्री करणारी दुकाने उघडपणे चालू होत असल्याचे आढळून येत आहे. मंदिराचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी मंदिरापासून २ कि.मी. अंतरापर्यंत मांस आणि मद्य विक्री होऊ नये. अशा दुकानांवर सरकारने बंदी आणावी. यासह सर्व जागृत देवस्थाने मद्य आणि मांस मुक्त करण्यात यावीत, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आम्ही करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|