रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

रशिया-युक्रेन युद्धाला ९ मास पूर्ण होत आहेत. अजूनही संघर्ष थांबण्याची कोणतेही चिन्ह नाही. रशिया आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे. आधीच कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेली युरोपची आर्थिक घडी आता सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे. अमेरिकेला हा संघर्ष महागात पडत आहे. जग भरडले जात आहे. लाभ होत आहे तो केवळ चीनचा ! रशियाकडून स्वस्तात तेल, वाढती निर्यात यांमुळे सत्ता समीकरणे पालटत आहेत.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्रविषयक धोरणांचे विश्लेषक (१३.११.२०२२)
(साभार : फेसबुक पेज)