हिंदु असल्याचे सांगून अंसारीचा हिंदु मुलीवर बलात्कार

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादचे आणखी एक प्रकरण उजेडात !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोनभद्र (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील ओबारा येथे ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात आले आहे. येथील अंसारी नावाच्या मुसलमान तरुणाने ‘सोनू’ असे हिंदु नाव धारण करून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर  विवाहाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अंसारी याला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२२ या दिवशी पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. यास मुलीने विरोध केल्यावर अंसारीने मुलीला विवाहाचे आश्‍वासन देणे चालू केले. तरुणाचे खरे नाव कळताच पीडित मुलगी रडू लागली आणि तिने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी अंसारीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध चालू केला.

हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्यासाठी शहेनशाह आलम बनला ‘सचिन !’

कानपूरच्या शहेनशाह आलम याने ‘सचिन’ बनून बिहारमधील हिंदु तरुणीला लव्ह जिहादमध्य अडकवण्याचा प्रयत्न केला. शहेनशाह आलम हा ४५ वर्षांचा असून त्याने फेसबुकवर सचिन नावाचे बनावट खाते बनवले होते. या बनावट खात्याच्या माध्यमातून तो हिंदु मुलींशी मैत्री करत असे. त्याने बिहारमधील मोतिहारी येथील एका हिंदु तरुणीशीही मैत्री केली होती. त्याच्या फेसबुक खात्यावर त्याने ६ हिंदु तरुणींशी संभाषण केल्याचे उघड झाले आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रतिदिन हिंदु महिला आणि युवती या लव्ह जिहादला बळी पडत असतांनाही सरकारी यंत्रणा लव्ह जिहाद रोखण्यासाठी काहीही करत नाही, हे लक्षात घ्या !