आतंकवादी कर्नाटकातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत ! – मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

मंगळुरू येथील बाँबस्फोटाचे प्रकरण

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

चित्रदुर्गा (कर्नाटक) – आतंकवादी राज्यातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत. त्यासाठी मंगळुरू येथील कुकर बाँबच्या झालेल्या स्फोटाचे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १८ जणांना अटक करून कारागृहात डांबले आहे, तरीदेखील अशा घटना चालू आहेत. आतंकवादी बाहेरच्या राज्यांशी संपर्क ठेवून राज्यात लपून रहात आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने हे गांभीर्याने घेतले आहे.