६.२.२०२१ या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय 

१. श्री. अमित प्रभु, मुंबई

१ अ. देवता आणि हिंदु धर्म यांविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी सभेमधून मांडल्या गेल्या ! : ‘हिंदूंना जागृत करण्याची आणि हिंदु राष्ट्र स्थापन होण्याची किती आवश्यकता आहे ?’, हे हिंदु राष्ट्र-जागृती सभेमधून समजले. आतापर्यंत हिंदूंना नेहमी गृहित धरले जाऊन देवतांचा अपमान केला जात होता. हेच कधी इस्लाम किंवा ख्रिस्ती पंथ यांच्यासंदर्भात झाल्याचे पहाण्यात आले नाही. देवतांचा असा होणारा अपमान थांबवायला हवा. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हिंदु धर्मविरोधी पुष्कळ गोष्टी दाखवल्या जातात. त्याविषयी पुष्कळ महत्त्वपूर्ण गोष्टी सभेमधून मांडल्या गेल्या. सध्या ‘वेबसेरीज’च्या माध्यमातूनही पुष्कळ चुकीच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत.

१ आ. सभेमध्ये प्रत्येक हिंदु जागृत होण्यासाठी केलेले मार्गदर्शन पुष्कळ छान होते आणि नवीन तंत्रज्ञान वापरून सभा अत्यंत सुंदर प्रकारे सादर केली गेली ! : हिंदू आतापर्यंत सर्व गोष्टी सहन करत होते. यापुढे त्यांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हिंदु धर्माविषयी होत असलेला अपप्रचार रोखणे आवश्यक आहे. प्रत्येक हिंदूने याविषयी जागरूक रहाणे महत्त्वाचे आहे.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पुष्कळ छान मार्गदर्शन केले. सभेमध्ये मला पुष्कळ नवीन माहिती समजली. नवीन तंत्रज्ञान वापरून ही सभा सादर केली गेली. त्यामुळे पुष्कळ सुंदर पद्धतीने तिची मांडणी होती. सभा चालू असतांना ‘जणू आपण प्रत्यक्ष सभेला उपस्थितच आहोत’, असे मला वाटत होते. यासाठी संपूर्ण तांत्रिक विभागाचे कौतुक !’

२. श्री. शशिकांत तायशेटे, माडखोल, सावंतवाडी.

२ अ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा पाहून सर्वच कुटुंबियांना प्रेरणा मिळाली ! : ‘ही सभा कुटुंबातील आम्ही सर्व सदस्यांनी एकत्रित पाहिली. आम्हा सर्वांनाच सभा पुष्कळ भावली. माझा मुलगा अभियांत्रिकीमध्ये तृतीय वर्षात शिकत आहे. सभा संपताक्षणी तो मला म्हणाला, ‘‘सभा पाहिल्यामुळे माझ्यामध्ये धर्मप्रेम वाढले आहे.’’ माझी मुलगी विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहे. तिला स्वसंरक्षण प्रात्यक्षिके पुष्कळ आवडली. या सभेमुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळाली. यापुढे आम्ही हिंदु जनजागृती समितीचे सर्व ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आवर्जून पहाणार आहोत.’

३. सौ. समृद्धी म्हाडगूत, सावंतवाडी

३ अ. हिंदूंना आत्मचिंतन करायला लावणारी सभा : ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा पुष्कळच सुंदर झाली ! आरंभापासून शेवटपर्यंत सर्वच सादरीकरण उत्कृष्ट होते ! सर्वच वक्त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. प्रत्येक हिंदूला आत्मचिंतन करण्यास लावणारी सभा होती. काळाची आवश्यकता ओळखून हिंदु धर्म, साधना, स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार हे सर्व मांडण्यात आले. आपल्या सर्व उपक्रमांच्या माध्यमांतून हिंदु राष्ट्र निर्माण होण्यास निश्चित हातभार लागेल !

४. कु. प्राजक्ता कोनाडकर, वेंगुर्ला

४ अ. सभेतून हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी चैतन्य आणि प्रेरणा मिळाली ! : ‘सभा पुष्कळ छान झाली. ही सभा ‘ऑनलाईन’ असली, तरी ‘मैदानात सभा झाली’, असे मला वाटले. वक्त्यांच्या मार्गदर्शनातून हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी प्रेरणा मिळाली. सभेत सतत चैतन्य जाणवत होते.’

५. सौ. विद्या कोनाळकर, कुडाळ

‘सभा ऐकून मला छान वाटले आणि ‘हिंदु राष्ट्रासाठी योगदान द्यायला पाहिजे’, असे वाटले.’

६. श्री. उदय गोखले, मुंबई

६ अ. ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय सर्वांपर्यंत पोचणे आवश्यक ! : ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा पुष्कळ छान झाली. नवीन पिढीसाठी हे अतिशय आवश्यक आहे. आपण सर्वांनी अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोचवून हिंदु राष्ट्राची उभारणी आणि आध्यात्मिक विकास यांसाठी सिद्ध व्हायला हवे.’

७. श्री. अनंत बेहेरे, मुंबई

७ अ. सध्याच्या दिशाहीन पिढीसाठी ‘धर्मशिक्षण’ हाच एक पर्याय आहे ! : ‘देशाची आर्थिक आणि सामाजिक अवस्था, देश स्वतंत्र होऊनही ‘धर्माची चाललेली दुर्दशा, हिंदूंची पिळवणूक, इतिहासाची केलेली मोडतोड, खोटेपणा, धूळफेक, चुकीच्या मार्गाने चालणारी शिक्षणव्यवस्था’, यांमुळे सध्याची पिढी दिशाहीन झाली आहे. यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे धर्मशिक्षण, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र !’

८. सौ. आरती कदम, भांडुप

८ अ. शाळेतूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे शिक्षण दिले पाहिजे ! : ‘सभा अतिशय छान झाली. आम्ही जे ऐकले, ते तरुण पिढीला सांगितले, तर ते त्यांना पटत नाही. यासाठी शाळेतूनच धर्म आणि राष्ट्र यांविषयीचे शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे, तरच शाळेतून धर्माचे शिक्षण दिले जाईल. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके छान होती.’

९. श्री. बाळा पाताडे, मुंबई

९ अ. आपल्या संस्कृतीची जपणूक करायला हवी ! : ‘हिंदु संस्कृती आणि धर्म यांच्याविषयी जागृती झाली पाहिजे. त्या दृष्टीने काय करता येईल ? ‘आपल्या संस्कृतीची जपणूक आपणच करायला हवी’, याची मला जाणीव झाली. यातून मला धर्मशिक्षणाची आवश्यकता कळली.’

१०. श्री. सूर्यकांत म्हादये, मुंबई

१० अ. ‘धर्माचरण करणे’ हे हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे !  : ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा पाहून पुष्कळ छान वाटले. वक्त्यांनी पुष्कळ चांगला विषय मांडला. धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता आहे आणि ‘धर्माचरण करणे’ हे आपले आद्यकर्तव्य आहे’, हे मला प्रकर्षाने जाणवले.’

सभेचा प्रसार करतांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी डॉक्टर वाचिकेने दिलेला अभिप्राय

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील अनुभूती वाचून मनाला प्रेरणा मिळते !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील अनुभूती वाचून मनाला प्रेरणा मिळते. पूर्वी दैनिकात येणारे श्रीकृष्णाचे वचन वाचून मला अंतरात पुष्कळ आनंद जाणवायचा आणि मनाला उभारीही मिळायची.’

– डॉ. वृषाली पवार (वाचिका), पिंगुळी, कुडाळ.

(सर्व सूत्रांचा दिनांक ६.३.२०२१)