उत्तरप्रदेशमध्ये गुल महंमद आणि अझर हसन यांनी हिंदु मुलीचे केले अपहरण

फिरोजाबाद – उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील गुल महंमद आणि अझर हसन यांनी शेजारच्या एका हिंदु मुलीचे अपहरण केल्याची घटना १९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी घडली. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोपी गुल महंमद आणि अझर हसन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १९ नोव्हेंबरला पहाटे त्यांच्या मुलीला त्याच गावातील गुल महंमद आणि अझर हसन यांनी दुचाकीवरून पळवून नेले. त्यांनी मुलीचा शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. ‘माझ्या मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करा’, ई मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशांना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा त्यांना देणे आवश्यक !