प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

श्री. नितीन शिंदे

प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘शिवप्रतापभूमी’वरील दर्गा, मशिद यांसह निर्माण केलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यासाठी आम्ही ‘शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’ची स्थापना करून संघटितपणे लढा दिला. सध्या विविध गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आंदोलन करत आहे. विशेष करून विशाळगडावरील अतिक्रमणांच्या मुक्तीसाठी समिती लढा देत आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याला असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे सरकारने महाराष्ट्रातील अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि या सर्व गडदुर्गांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून द्यावे.