कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !

‘कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली. यात ‘राजा हा त्या शरिराचा ‘आत्मा’, प्रधानमंत्री म्हणजे ‘मेंदू’, सेनापती म्हणजे ‘बाहु’ आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरिराचे ‘डोळे’ अन् ‘कान’ असे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग अन् तीक्ष्ण असतील, तितके ‘राज्य’ सुरक्षित असते’, असा सिद्धांत कौटिल्य मांडतो.’

(साभार : मासिक ‘धार्मिक’, दीपावली विशेषांक २०१७)