श्रद्धाला ओळखता येऊ नये, यासाठी हत्येनंतर तिचा चेहरा जाळला ! – आरोपी आफताबची स्वीकृती

आरोपी आफताब आणि श्रद्धा वालकर

नवी देहली – श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिला ओळखता येऊ नये, यासाठी तिचा चेहरा जाळल्याची स्वीकृती आरोपी आफताब पूनावाला याने पोलीस चौकशीत दिली. ‘श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या शरिराची विल्हेवाट कशी लावायची?’, याविषयी माहिती इंटरनेटवरून मिळवल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

देहलीत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहाणार्‍या (विवाह न करता एकत्र रहाणार्‍या) श्रद्धा वालकर हिचा प्रियकर आफताब पुनावाला याने १८ मे २०२२ या दिवशी, म्हणजे ६ मासांपूर्वी तिची गळा दाबून हत्या केली होती. हत्येच्या दुसर्‍याच दिवशी त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून घरातील शीतकपाटात ठेवले होते. त्यानंतर त्याने सलग १६ दिवस देहलीतील मेहरोली जंगलात विविध ठिकाणी तुकडे केलेले हे अवयव फेकले. या अवयवांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या जंगलात १० ते १३ हाडे सापडली आहेत. ‘ही हाडे श्रद्धाचीच आहेत का ?’, हे पडताळण्यासाठी ती न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आली आहेत. अद्याप श्रद्धाचे शीर सापडलेले नाही. श्रद्धाच्या सापडलेल्या अवयवांची पडताळणी करण्यासाठी तिच्या वडिलांचे डी.एन्.ए. नमुने घेण्यात आले आहेत. चौकशीच्या वेळी अफताब हा सातत्याने जबाब बदलत असून पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादच्या या अत्यंत संतापजनक दृष्कृत्याविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना आणि त्यांचे ओवैसी, अबु आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !