३६३ वर्षे झाली, तरीही अफझलखानाला कबरेत समाधान नव्हते. भोसले कुलवंशाचा द्वेष्टा अफझलखान राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या महाद्वारातून प्रतापगड रोखाने बघून फक्त पुटपुटत होता, ‘वो, वो, फर्जंद शहाजी भोसले का बच्चा कही हमारी अब भी राह तो नही देख रहा ?’; पण रायगडावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मात्र अस्वस्थ होते… ‘ज्या खानास मिटवून आम्ही हिंदवी स्वराज्य नावे रणशिंग फुंकून मराठ्यांच्या अस्मितेचे खरे शिल्प राजगडी पुरले, तेव्हा या प्रतापगड पायथी हा पुन्हा जिवंत कैसा जाहला ?’
पण ती अस्वस्थ धग कुणीतरी ओळखली आणि खानाच्या मस्तवाल कबरेस आव्हान केले, ‘तू आमच्या विजयाचे प्रतीक म्हणून आहे. मग तुझे अस्तित्व एवढे भव्य कसे काय ?’ यानंतर भोसले कुलवंशाचा लढा चालू झाला आणि तो आज (१० नोव्हेंबर २०२२ या दिवशी) पूर्णत्वास आला. खर्या अर्थाने खानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यासाठी झुंजणार्या माऊलीचा (श्रीमती विजयाताई भोसले यांचा) लढा आज संपला. श्रीमती विजयाताई भोसले यांना नमन !
– एक धर्मप्रेमी (साभार : सामाजिक माध्यम) (११.११.२०२२)