कोरोनाकाळात हरवलेल्या ३ लहान मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर !

बालगृहाचे संचालक हसीन परवेझ यांनी दिली मुसलमान नावे

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथून जवळ असलेल्या रायसेनमध्ये ४ ते ८ वर्षे या वयोगटांतील ३ हिंदु मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाकाळात आई-वडिलांपासून दुरावलेली २ मुले आणि १ मुलगी यांच्यासमवेत हा प्रकार घडला.

१. वर्ष २०२० मध्ये कोरोनाकाळात भोपाळच्या रस्त्यावर फिरणार्‍या या मुलांना रायसेनमधील बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले होते. ते आता एका बालगृहामध्ये आढळून आले. या बालगृहाचे संचालक हसीन परवेझ यांनी या मुलांचे धर्मांतर करून त्यांचे नाव पालटून मुसलमान परंपरेनुसार नाव ठेवले.

२. या तिघांच्या आधार कार्डवरील नावेही पालटण्यात आली आहेत. आई-वडिलांच्या नावांच्या जागी परवेझ याचेच नाव टाकण्यात आले आहे.

३. या प्रकारामुळे राष्ट्रीय बाल आयोग खडबडून जागा झाला आहे. अधिकार्‍यांनी या बालगृहाचे नोंदणी पुस्तक जप्त केले आहे.

४. आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो हे बालगृहात गेले असता तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या मुलांच्या आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

  • या घटनेवरून कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता स्पष्ट होते !