काशी विश्‍वनाथ मंदिरात प्रवेश करणार्‍या तिघे संशयित पोलिसांच्या कह्यात !

तिघांपैकी दोघे मुसलमान, तर एक हिंदु

काशी विश्वनाथ मंदिर

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ मंदिरात प्रवेश करणार्‍या तिघा संशयितांना पोलिसांनी पकडले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यात दोघे मुसलमान, तर एक त्यांचा हिंदु मित्र आहे. मुसलमानांनी हिरव्या रंगाचे उपरणे गळ्यात घातल्याने पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांना कह्यात घेतले. हे तिघेही झारखंडच्या गिरडीह येथील रहाणारे आहेत.