‘उत्कृष्टता’ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आंतरिक प्रवासाचा (साधनेचा) ध्यास असायला हवा !

श्री. कोंडिबा जाधव

‘एका साधकाने ‘त्याची कला बुद्धीच्या स्तरावर सादर न होता भावाच्या स्तरावर होऊ दे !’, अशी प्रार्थना केल्यावर त्याचे कला सादर करणे, भावाच्या स्तरावर होऊ लागले आणि कला ही त्याची सहज प्रवृत्ती झाली. हे सूत्र ऐकल्यावर माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट मला आठवली. ‘मार्क पिट्स’ या मोठ्या अमेरिकन जलतरणपटूने ऑलिंपिकमध्ये पुष्कळ पदके मिळवली. एकाने त्याला विचारले, ‘‘तुला इतकी पदके कशी मिळाली ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘प्रथम मला पाण्यात फेकले गेले. मग मी हात-पाय मारायला शिकलो. त्यानंतर मी पोहायला शिकलो. सध्या पाणी मला पुढे नेते.’’ जलामध्ये मासा रहातो, तसा तो आता जलचर झाला आहे. त्याच्यामध्ये इतकी सहजता आली आहे. व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो, ‘उत्कृष्टता’ हा ध्यास असायला हवा आणि तो सामाजिक, सांस्कृतिक आणि आंतरिक प्रवासाचा हिस्सा बनायला हवा. हे एक नैसर्गिक मूल्य आहे आणि साधनेतही ते उपयुक्त आहे.’

– श्री. कोंडिबा जाधव (वय ७२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा. (२६.१.२०२२)