सध्याचे प्रलंबित खटले निकाली लागण्यासाठी ३२४ वर्षे लागतील, ही स्थिती आणणार्‍यांना शिक्षा करा !

‘देशात एकूण प्रलंबित खटल्यांची संख्या ही ३ कोटी ६० लाख इतकी आहे. सध्या देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये अनुमाने ५६ लाख खटले प्रलंबित आहेत. यांत ५९ सहस्र ५९५ खटले गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत. सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, जर सध्याच्या गतीने खटले निकाली निघत राहिले, तर सर्व खटले निकाली निघण्यासाठी ३२४ वर्षांचा कालावधी लागेल.’ (नोव्हेंबर २०२१)