प्लेटो : शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक यांचा विकास करणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण आहे.
जोहान पेस्टोलॉत्सी : शिक्षणामुळे व्यक्तीच्या मानसिक शक्तींचा स्वाभाविक, समन्वित (व्यवस्थित) आणि प्रगतीशील विकास होतो.
रेमन्ट : शिक्षण विकासाची अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मनुष्य बालपणापासून प्रौढत्वाच्या दिशेने प्रगती करत असतो.
स्वामी विवेकानंद : शिक्षणाचा उद्देश आहे की, व्यक्तीच्या आंतरिक क्षमतांचा सर्वांगीण विकास करणे, जेणेकरून तो समाजामध्ये आपले स्थान स्थापन करून समाज, देश आणि विश्व यांच्याप्रती आपले दायित्व निभावू शकेल.
(संदर्भ : ‘मासिक संस्कारम्’, मार्च २०१८)