९०० किलो गोवंशियांच्‍या मांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधावर कुरकुंभ (पुणे) येथे गुन्‍हा नोंद !

कुरकुंभ (जिल्‍हा पुणे) – पुणे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर दौड तालुक्‍यातील स्‍वामी चिंचोली हद्दीत एका टेंपोत प्‍लास्‍टिक ड्रममध्‍ये गाय आणि बैल यांचे ९०० किलो मांस अवैधपणे घेऊन जातांना पोलिसांनी टेंपोचालक अन् मांस असा ३ लाख ४४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. या प्रकरणी टेंपोचालक इमान शेख, गोवंशियांची कत्तल करणारे आणि मांस विकत घेणारे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंद केला आहे. या प्रकरणी अजित असवले यांनी तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

संपादकीय भूमिका

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या केली जाणे आणि गोरक्षकांवर जीवघेणे आक्रमण होणे संतापजनक आहे. वाहनचालक आणि वाहने यांवर कारवाई करण्‍यासमवेत मूळ सूत्रधारांवरच पोलिसांनी कडक कारवाई करून गोहत्‍या रोखण्‍यासाठी प्रयत्न करावेत, हीच गोरक्षकांची अपेक्षा आहे !