भिंड (मध्यप्रदेश) येथील स्मशानभूमीतील मंदिरामधील घंटा आपोआप वाजू लागली !

भिंड (मध्यप्रदेश) – भिंड शहरातील धर्मापुरी मुक्तिधाम स्मशानभूमीमध्ये महाकाल मंदिर आहे. या मंदिरात असलेली घंटा सायंकाळी अचानक आपोआप हलू आणि वाजू लागली.

या घंटेचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. ही घटना पहाण्यासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणेत गर्दी झाली होती. अनुमाने ४ घंटे ही घंटा वाजत होती. याविषयी सध्या कोणतेही कारण समोर आलेले नसले, तरी लोक या घटनेला भूत किंवा दैवी शक्ती यादृष्टीने पहात आहेत.