हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने घरोघरी दीप लावण्याचे आवाहन !

हिंदु जनजागृती समितीचे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियान !

मुंबई – ८ नोव्हेंबर या दिवशी असणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने देवालय, घरोघरी, नदीघाटावर दीपोत्सव साजरा करण्याची हिंदूंची परंपरा आहे. याच परंपरेतील एक भाग म्हणून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, छत्रपती शिवाजी महाराज-रामराज्य यांप्रमाणे प्रत्येक हिंदूचे जीवन आदर्श असावे, यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी घरोघरी दीप लावण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या अंतर्गत हिंदूंनी स्वतःच्या घराबाहेर दीप प्रज्वलित करावा आणि ते छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दीप प्रज्वलित करतांना करावयाची प्रार्थना !

‘हे श्रीकृष्णा, हिंदु राष्ट्राचा दीप आम्ही आपल्या चरणी समर्पित करत आहोत. सर्व हिंदूंच्या हृदयातील ‘हिंदु राष्ट्रा’चा दीप जागृत होऊन आम्हा सर्वांना या धर्मकार्यामध्ये सहभागी होता येऊ दे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होऊ दे. आम्हा सर्व जिवांची साधना होऊ दे. आपली कृपादृष्टी आम्हा सर्वांवर अखंड राहू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.