विडंबनात्मक सादरीकरण करणार्‍याला कुणीही आदर्श मानत नाही ! – महंत पवनकुमारदास शास्त्री, महामंत्री, अयोध्या संत समिती

महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

जर व्यक्तीचे आचरण योग्य असेल, तरच चित्रपटातील ते पात्र जिवंत वाटेल. रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना लोक आजही सन्मान देतात, त्यांना नमस्कार करतात. लहान मुले जे पहातात, त्याचे अनुकरण करतात आणि त्यातूनच त्यांचे चरित्र घडते. याउलट विडंबनात्मक सादरीकरण करणार्‍याला कुणीही आदर्श मानत नाही. अयोग्य कलाकृतींमुळे जनमानस आंदोलित होते आणि त्यांना वेदना होतात.