गुजरातमध्ये समान नागरी कायदा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार !

कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील भाजप सरकारने राज्यात समान नागरी कायदा बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी उत्तराखंडमधील भाजप सरकारने त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे.

संपादकीय भूमिका

एकेक राज्यांत अशा प्रकारे समान नागरी कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठीच हा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !