‘युनिलीव्हर’ आस्थापनाने अमेरिकेतील बाजारातून परत मागवली उत्पादने !

‘ड्राय शॅम्पू’मुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकत ‘युनिलीव्हर’ आस्थापनाने ‘डव्ह’, ‘एयरोसोल ड्राय शॅम्पू’सह अनेक प्रसिद्ध ‘ब्रॅँड्स’ची उत्पादने बाजारातून परत मागवली आहेत. या आस्थापनाच्या अनेक शॅम्पूंमध्ये ‘बेंजीन’ नावाचे एक धोकादायक रासायनिक द्रव्य आढळले आहे, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका आहे. ‘युनिलीव्हर’ने तिच्या उत्पादनांमध्ये बेंजीनचे प्रमाण किती आहे ?’, याविषयी माहिती दिलेली नाही; मात्र त्यांची सर्व उत्पादने परत मागवली आहेत. ‘ड्राय शॅम्पू’ हे ‘स्प्रे’प्रमाणे असतात. केस ओले न करता ते स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो.

संपादकीय भूमिका

‘युनिलीव्हर’ हे आंतरराष्ट्रीय आस्थापन आहे. तिची उत्पादने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वितरित होतात. हे पहाता तिने अन्य देशांतूनही ही उत्पादने मागे घेतली पाहिजेत. या संदर्भात भारत सरकारने देशात स्वतःहून अशा उत्पादनांवर बंदी घातली पाहिजे !